नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – महामार्गावरील संतोष नर्सरी जवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत २४ वर्षीय परप्रांतीय क्लिनरचा मृत्यू झाला. महमंद रहिम महंमद कयामुद्दीन (रा.सिलीगुडी,पं.बंगाल) असे मृत युवकाचे नाव आहे. या अपघात प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कयामुद्दीन गेल्या सोमवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास सहकारी चालकासमवेत महामार्गावरील गुरूनानक पेट्रोल पंपाजवळील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी जात असताना हा अपघात झाला होता. आडगाव ब्रीज कडून महामार्गाने पेट्रोल पंपाच्या दिशेने दोघे पायी जात असतांना नाशिककडून ओझरच्या दिशेने रॉंगसाईड जाणा-या अज्ञात दुचाकीने त्यास जोरदार धडक दिली होती. या अपघातात डोक्यास व कानास गंभीर दुखापत झाल्याने त्यास तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी (दि.२३) वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी भाऊ शबनम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करम्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.