नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी शिवारात मद्याच्या नशेत बांधकाम साईटवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. केशव जगन्नाथ चंद्रकोर (५७ रा.दोंदेमळा,सुखदेवनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रकोर हे शुक्रवारी (दि.२८) परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर गेले होते. मद्याच्या नशेत ते बहुमजली इमारतीवर पाहणी करीत असतांना अचानक तोल जावून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच १०८ अॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शरद दोंदे यांनी खबर दिल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.