नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी अमरधाम परिसरात शितळादेवी मंदिरासमोर कारने धडक दिल्याने १५ जण जखमी झाले. यात कारमधील चार जण तर अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांचा समावेश आहे. सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांपैकी १० जण या अपघातात सापडले. कार भरधाव वेगाने आल्यामुळे हा अपघात झाला. या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असते. त्यामुळे येथे अनेकांचा अंदाज चुकतो. त्यामुळे भरधाव वेगाने येथे वाहन चालवणे अवघड आहे. अशात ही कार वेगाने आल्यामुळे या अपघातात कारमधील पाच जणही जखमी झाले. अमरधामकडून नानावलीकडे ही कार भरधाव वेगाने चालली होती. त्यात ही घटना घडली.