नाशिक : २० वर्षीय तरूणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना पेठरोड वरील आरटीओ कार्यालय भागात घडली. अंकिता नाना पोटे (रा.श्रीसाई अपा.शारदा हॉस्पिटल मागे) असे मृत युवतीचे नाव आहे. अंकिताच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. अंकिताने सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.