नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया ठिकाणी किरकोळ भांडणातून दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेसमवेत दोन दिवसांपूर्वी शेजा-यांचा वाद झाला होता. याच कारणातून गेल्या मंगळवारी (दि.२५) महिला घरी एकटी असतांना संशयितानी कुरापत काढून वाद घातला. यावेळी महिला संशयिताने तिला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी संतप्त महिलेने पीडितेचे कपडे काढण्याची चिथावणी दिल्याने दोघांनी पीडितेचा विनयभंग केला. दुसरी घटना याच भागातील त्रिकोणी बंगला रोडवरील आयोध्यानगरी भागात घडली. चिंतामणीनगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित एकाच भागातील रहिवासी असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. संशयित अनिरूद्द बाविस्कर,माधुरी वानखेडे,दिपीका वानखेडे व अर्चना वानखेडे आदीनी मंगळवारी (दि.२५) पीडिता व तिच्या बहिणीस शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संशयित महिलांनी चिथावणी दिल्याने बाविस्कर याने पीडितेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे सहाय्यक निरीक्षक पडोळकर व उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत. तर जुने नाशिक भागात राहणारी पीडिता मंगळवारी (दि.२५) वडिलांना सोबत घेवून दहा महिन्यांच्या मुलास दुधबाजार येथील डॉ.मुस्सदीक सरदार यांच्या दवाखान्यात जात असतांना ही घटना घडली. बाप लेक मुगल दरबार हॉटेल समोरून पायी जात असतांना पाठीमागून एमएच १५ एफडी ८५७४ या दुचाकीवर आलेल्या सुमित विश्वास गुंजाळ (रा.विहम फिटनेस समोर,कामटवाडे) या दुचाकीस्वाराने महिलेचा हात पकडून चल माझ्या सोबत गाडीवर बस असे म्हणत पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.