नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढतांना महिलेच्या गळयातील पर्स उघडून चोरट्यांनी पाकिट लंपास केले. या पाकिटात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे १९ हजाराचा ऐवज होता. या चोरीप्रकरणी दिपाली अमित विधाते (रा.वृंदावननगर,कामटवाडे) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधाते या गेल्या मंगळवारी (दि.२५) कुटुंबियासह बाहेरगावी जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. पती मुलांसह त्या कोपरगाव बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या गळयातील पर्सची चैन उघडून त्यातील पाकिट चोरून नेले. पर्स मध्ये सोन्याचे मंगळसूत्र, नथ, ताळेबंदी सातशे रूपयांची रोकड, डेबिट कार्ड, महत्वाची कागदपत्र असा सुमारे १८ हजार ७०० रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार रोहिदास सोनार करीत आहेत.