नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच मोटारसायकली चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी मुंबईनाका,गंगापूर उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुना गंगापूरनाका भागातील अभिषेक अनिल डागा हे मंगळवारी (दि.२५) रात्री नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी गोल्फक्लब मैदानावर गेले होते. चांडक सर्कल कडून जलतरण सिग्नल कडे जाणाºया मार्गावरील प्रवेशद्वाराच्या बाजूला त्यांनी आपली अॅक्सेस मोपेड एमएच २० ईक्यू १७३३ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत. दुसरी घटना ध्रुवनगर येथे घडली. विनायक बबनराव आव्हाड (रा.अक्षर गार्डन अपा.ध्रुवनगर ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांची पल्सर एमएच १५ एचडी ५२६१ गेल्या रविवारी (दि.२३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक सरनाईक करीत आहेत. तिसरी घटना जयभवानीरोड भागात घडली. प्रदिप शंभू हाडा (रा.अॅमराईड पार्क फर्नांडीसवाडीसमोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. हाडा यांची एमएच १५ डीई ८८०४ गेल्या बुधवारी (दि.१९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत. सचिन साहेबराव व्हडगर (रा.सौभाग्य सोसा.व्यापारी बँकेसमोर,आशानगर) यांची पल्सर एमएच १५ जीपी ८८५५ गेल्या शनिवारी (दि.२२) रात्री त्यांच्या राहते घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत. तर योगेश रामकृष्ण म्हरसाळे (रा.राजमुद्रा नेस्ट,रविशंकर मार्ग,वडाळा शिवार) यांची स्प्लेंडर एमएच १५ एफएक्स ४९३१ गेल्या रविवारी (दि.२३) शालिमार येथील राजेबहाद्दूर लेन येथील गोकुळ बंगल्यासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक आहेर करीत आहेत.