राहत्या घरी स्व:तास पेटवून घेतलेल्या ६३ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राहत्या घरी स्व:तास पेटवून घेतलेल्या ६३ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रंजना रविंद्र भागवत (रा.सप्तशृंगी अपा.स्वामी स्मार्थ मंदिराजवळ दिंडोरीरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. भागवत यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत यांनी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी पेटवून घेतले होते. या घटनेत त्या ४८ टक्के भाजल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि.२४) सायंकाळी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमेश्वर कॉलनी भागात असलेल्या नाल्यालगत घडली. अरूण गोरख शिरसाठ (५० रा.पाथर्डी फाटा) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाठ यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शिरसाठ यांनी सोमवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास सोमेश्वर कॉलनी शेजारील आपना घर समोरील नाल्यालगतच्या एका झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रशांत शिरसाठ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.