नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील मेहरधाम भागात चोरट्यांनी बेडरूममध्ये हँगरला टांगलेल्या पॅण्टमधील ४० हजाराची रोकड लंपास केली. या चोरीप्रकरणी धनंजय काकड (रा.देवी वाघेश्वरी बिल्डींग,मेहरधाम मंदिरामागे) यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकड गेल्या ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममध्ये हँगरला टांगलेल्या पॅण्टच्या खिशातील ४० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.