नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागातील म्युझिक अॅकडमी फोडून चोरट्यांनी सुमारे ७६ हजाराचा ऐवज लंपास केला. या अॅकाडमीतून चोरट्यांनी रोकडरक्कमसह साऊंड सिस्टीम, लॅपटॉप आणि एलईडी टिव्ही चोरुन नेले. या चोरी प्रकरणी अनिरूध्द सुहास भुधर (रा.नारायणबापूनगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुधर याची महात्मानगर येथील बंजारा हॉटेलमागे म्युझोफ्रिका म्युझिक क्लासेस नावाची संगीत शिक्षण देणारी अॅकाडमी आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.१९) रात्री अॅकाडमी असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी क्लासरूममधील गल्यातील १५ हजाराची रोकड, एलईडी टिव्ही, लॅपटॉप आणि साऊंड सिस्टीम असा सुमारे ७६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.