नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड भागात पोलिसात तक्रार दिल्याने संतप्त दोघांनी कार अडवित चालकास धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंडू काळू गरूड (रा.मारूती मंदिराजवळ,म्हसरूळ ) यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद मोराडे व त्याचा एक साथीदार अशी धमकी देणा-या संशयितांची नावे आहेत.गरुड शुक्रवारी (दि.२१) आपल्या कारमधून दिंडोरीरोडने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. वक्रतुंड हार्डवेअर दुकानाजवळ संशयितांनी कार अडवून गरूड यांना खिडकीची काच खाली करण्याचे सांगितले. यावेळी मामा शरद टिळे यांच्या विरोधात पोलिसात का तक्रार दाखल केली असा जाब विचारत संशयितांनी तू गाडी खाली उतर तुला दाखवतो असे म्हणत संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत.