नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड भागात बंद दवाखान्याचे शटर उचकटून चोरट्यांनी लॅपटॉप लंपास केला. या चोरीप्रकरणी डॉ.आशुतोष शिरसाठ (रा.लॅमरोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शिरसाठ यांचा रेजिमेंटल प्लाझा येथे सुखकर्ता नावाचा दातांचा दवाखाना आहे. गेल्या रविवारी (दि.१६) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद क्लिनीकचे शटर वाकवून हॉस्पिटल मधील सुमारे २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.