नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या भागातून दोन दुचाकी चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी सातपुर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना सातपूर कॉलनीत घडली. दिनेश आबा मराठे (रा.ओम साईराम चौक,सातपूर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठे यांची पल्सर एमएच १५ एचजे ४३६० गेल्या रविवारी (दि.९) रात्री त्यांचा घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत. दुसरी घटना पेठरोड येथील हमालवाडीत घडली. येथे राहणारे प्रसाद निवृत्ती बोडके यांची अॅक्टीव्हा एमएच १५ इक्यू ९४७६ गेल्या सोमवारी (दि.३) मार्केट यार्डातील सप्तशृंगी हॉटेल समोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.