नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कानडे मारूती लेन भागात आकाश कंदिल खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी वृध्देच्या बॅगेतील पाकिट लंपास केले. या हॅण्ड पाकिटात सोन्याचे मंगळसूत्र होते. या चोरीप्रकरणी शोभा मुकूंद चतुर (६४ रा.तारवालानगर,दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुर या बुधवारी (दि.१९) दिवाळीची खरेदी करण्यासाठी मेनरोड भागात गेल्या होत्या. कानडे मारूती लेन येथील रूची नॉव्हेल्टी दुकानात त्या आकाश कंदील खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरटयांनी त्याची बॅगेची चैन उघडून पाकिट चोरून नेले. या पाकिटात सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र होते. अधिक तपास पोलिस नाईक निंबाळकर करीत आहेत.