नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गायकवाडनगर भागात ट्रायल घेण्याचा बहाणा करून अॅक्टीव्हा पळवून नेल्याचा प्रकार घडला. दुचाकी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरूणाने ही दुचाकी पळवली. याप्रक्रणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीची श्रेयस संजय बोथरा ( रा.जैन कॉलनी,गायकवाडनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बोथरा यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एएम ८४०० विक्री करायची असल्याने त्यानी सोशल मिडीयावर जाहिरात केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास ९३७१५७२६७४ या मोबाईधारकाने बोथरा यांच्याशी संपर्क साधला होता. बोथरा यांनी सदर व्यक्तीस घराचा पत्ता सांगितल्याने समीर मोतीवाला नाव धारण केलेला व्यक्ती घरी आला होता. यावेळी संशयिताने दुचाकीची पाहणी करून ट्रायल घेवून बघतो असे सांगून दुचाकी घेवून गेला तो अद्याप परतला नाही. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच बोथरा यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.