नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंसारा माता चौकात जेसीबीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार तरूण जखमी झाला असून त्याच्या बरगडीस गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची तुषार रघूनाथ गाडेकर (२९ रा.कृष्णा व्हॅली,कन्यादान लॉन्सजवळ यशवंतनगर) या युवकाने तक्रार दाखल केली असून पसार झालेल्या जेसीबी चालकाविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडेकर बुधवारी (दि.१९) एमएच १७ सीक्यू ७५४५ या आपल्या दुचाकीवर म्हसरूळ कडून राहू हॉटेल चौकाच्या दिशेने प्रवास करीत होता. कंसारा माता चौकातील कमल स्विट दुकानासमोर हा अपघात झाला. एमएच १५ एचजी ९२१३ या जेसीबी वरील चालकाने निष्काळजीपणे आपले वाहन दामटल्याने ही घटना घडली. जेसीबीचे पाठीमागील बकेटने ठोस मारल्याने दुचाकीचालक गाडेकर जखमी झाला असून त्याच्या डाव्या बाजूच्या बरगडीस गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जेसीबी चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून अधिक तपास पोलिस नाईक फुगे करीत आहेत.