नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारसह चोरट्यांनी वेगवेगळया ठिकाणाहून दोन मोटारसायकली चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी भद्रकाली, पंचवटी आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत मखमलाबाद नाका येथून चोरट्यांनी क्रेटा कार चोरुन नेली आहे. या चोरीप्रकरणी सत्यानंद चंद्रकांत ठाकरे (रा.रामचंद्र अपा.म.बाद नाका) यांनी तक्रार केली आहे. मंगळवारी रात्री परिसरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालया जवळील मोंघीबाई धर्मशाळा भागात पार्क केलेली एमएच १५ जीए ७२९० ही कार चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत. तर दोन घटना मोटरसायकल चोरीच्या घडल्या आहे. पहिल्या घटनेत विजय रंगनाथ हळदे (रा.वेदांत रेसि.मखमलाबाद) यांची स्प्लेंडर एमएच १५ डीएक्स ०७८३ गेल्या १ जून रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत. तर दुसरी घटना व्दारका परिसरात घडली आहे. वडाळानाका येथील शेखर राजेंद्र चव्हाण (रा.महालक्ष्मीचाळ) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जीएन ५४६१ गेल्या रविवारी (दि.१६) द्वारका परिसरातील टेमलाई माता मंदिर शेजारील झेरॉक्स दुकानासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.