नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणार्क नगर भागात कुटुंबिय घरकामात व्यस्त असल्याची संधी साधत घरात शिरलेल्या चोरट्याने फ्रिजवर वाटीमध्ये ठेवलेली सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी वंदना नंदू सोनवणे (रा.लोकमंगल सोसा.कोनार्क नगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे या सोमवारी दिवाळीनिमित्त घरकामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करून किचनमधील फ्रीजवर ठेवलेल्या वाटीतील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.