नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी बुधवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना जेलरोड भागात घडली. संतोष दगडू कांबळे (४० रा.श्री भक्ती सोसा.ज्ञानेश्वरनगर) यांनी बुधवारी घरी कोणी नसतांना अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच पत्नी ज्योती कांबळे यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
दुसरी घटना अंबड सातपूर लिंकरोड भागात घडली. येथे राहणा-या जितेंद्र रूंजा खताळ (रा.साई अपा.जाधव संकुल) या बारा वर्षीय मुलाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याच्या कडीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.