नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडी भागात इमारतीच्या दुस-या मजल्यावरून उडी घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. सागर भिका ठाकूर (३६ रा.कमलनगर,हिरावाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ठाकुर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाकूर याने मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून इमारतीच्या दुस-या मजल्यावरून उडी घेतली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने त्यास प्रथम सिनर्जी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.अभिषेक पेठे यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.