नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस आयुक्तालयाने ड्रोन जमा करण्याचे आदेशास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ दिली आली आहे. लष्करी हद्दीलगत अज्ञात ड्रोनने घिरटया घातल्यानंतर ड्रोन जमा करण्याचे आदेश काढण्यात आले होते. पोलिसांनी मनाई त्यानंतर सतरा ड्रोन मालक आणि चालकांनी आपले ड्रोन पोलिसांच्या स्वाधिन असून इतरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात लष्करी यंत्रणांचे तळ असल्याने अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. यामुळे शहरात १६ ठिकाणी नो फ्लाइंग झोन लागू आहेत. मात्र, महिनाभराच्या अंतराने कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल (कॅट्स), तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) क्षेत्रात ड्रोनने घिरटया घातल्याची घटना घडली. त्यामुळे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी लष्करी यंत्रणेशी चर्चा करून ड्रोन जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत. आयुक्तालय हद्दीत वापरण्यात येणारे सर्व ड्रोन पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश ऑक्टोबरच्या सुरुवातीला निर्गमित झाले. हे ड्रोन अर्ज केल्यानंतर वापरायच्या दिवशी चालकांना देण्यात येतील. तर, वेळोवेळी अर्ज करून ड्रोन वापरासाठी घेत पोलिसांचा सशुल्क बंदोबस्तही वापरकर्त्यांना घ्यावा लागणार आहे. सुरक्षेसाठी हे आदेश लागू झाले असले, तरी ड्रोन मालकांनी हजारो-लाखो रुपयांचे ड्रोन देण्याची पूर्णत: तयारी दर्शवलेली नाही. दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणारी लग्नसराईत ड्रोनचा वापर सर्वाधिक होणार आहे. यासंदर्भात काही फोटोग्राफरला ऑर्डरही आल्या आहेत. केवळ नाशिकच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरच्याही ऑर्डर येत आहेत. तेव्हा पुन्हा पोलिसांकडे अर्जफाटे करत ड्रोन ताब्यात घ्यावे लागतील. यासह हजारो-लाखो रुपयांच्या ड्रोनची सुरक्षितता पोलिस ठाण्यात राहील का, असा प्रश्न ड्रोन वापरकर्त्यांनी उपस्थित केला आहे. अवघ्या सतरा ड्रोन धारकांनी संबधीत पोलिस ठाण्यांकडे आपले ड्रोन जमा केले असून उर्वरीतांनाही मनाई आदेशाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मनाई आदेशास मुदत वाढ देण्यात आल्याने ही कारवाई कायम सुरू राहणार आहे. त्यामुळे ड्रोन चालकांसमोर ड्रोन जमा करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे दिसते.