नाशिक – पार्क केलेल्या कारसह चोरट्यांनी वेगवेगळया ठिकाणाहून पाच मोटारसायकली चोरुन नेल्या. याप्रकरणी गंगापूर, पंचवटी, भद्रकाली, इंदिरानगर, अंबड व उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गंगापूर रोडवरील प्रशांत दिनकर पाटील (रा.शांतीनिकेतन कॉलनी,प्रसाद मंगल कार्यालयाजवळ) यांची सुमारे सात लाख रूपये किमतीची क्रेटा कार एमएच १५ जीएल ५८५८ रविवारी (दि.१६) रात्री त्यांच्या बंगल्या समोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत. दुचाकी चोरीची पहिली घटना गोदाघाटावर घडली. भगवंत नामदेव आष्टेकर (रा.जाकीनगर,नांदूरनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आष्टेकर गेल्या गुरूवारी (दि.१३) गोदाघाट भागात गेले होते. यशवंतराव महाराज पटांगणावर लावलेली त्यांची पंचवटी एमएच १५ डीक्यू ८४१२ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक वाडेकर करीत आहेत. दुसरी घटना सारडा सर्कल भागात घडली. सत्तार मेहमुद सय्यद (रा.तलावडी,भद्रकाली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सैय्यद यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफपी २१८४ गेल्या बुधवारी (दि.५) रात्री जितेंद्र अॅटोमोबाईल शो रूम जवळील उमाशंकर सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक म्हसदे करीत आहेत. तिसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. महादेव हरिभाऊ जंजाळ (रा.म्हाडा घरकुल योजना,चुंचाळे शिवार ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जंजाळ यांची पॅशन मोटारसायकल एमएच १५ बीसी २८३६ गेल्या २७ जुलै रोजी पाथर्डी फाटा येथील पार्थ हॉटेल जवळील पानस्टॉल पाठीमागे लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बोराडे करीत आहेत. चौथी घटना चुंचाळे शिवारात घडली. प्रदिप आण्णा बिडकर (रा.साक्षी पार्क,मारूती संकुल) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बिडकर यांची मोटारासायकल एमएच १५ सीएल ९२४६ गेल्या रविवारी (दि.२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. तर धिरज कन्हैय्यालाल नकवाल (रा.अभिषेक अपा.गोसावी मळा,उपनगर) यांची सुमारे साठ हजार रूपये किमतीची बुलेट एमएच १५ जीझेड ३४६२ बुधवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.