नाशिक : हिरावाडी रोडवरील सोमनगर भागात घराचा मेन गेट पायावर पडल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक रवी खंदारे (वय ७ रा.कैलास टावर,सोमनगर) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार्तिक खंदारे हा बालक सोमवारी (दि.१७) आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ खेळत असतांना ही घटना घडली होती. अचानक घराचा लोखंडी मेन गेट त्याच्या पायावर पडला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ नजीकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.अनुप्रीत चंद्रात्रे यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.