नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सराफी दुकानात काम करणा-या नोकराने साडे सहा लाख रूपये किमतीचे दागिने लंपास केले. सुरेंद्रकुमार कमलेश किशोर वर्मा (रा.रामतीर्थ अपा.कलानगर,जेलरोड) असे दागिणे पळविणा-या संशयित नोकराचे नाव आहे. या चोरीप्रकरणी अजित श्रीकांत नागरे (रा.टागोरनगर,आंबेडकर नगर समोर) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरे यांचे मातोश्रीनगर भागातील शांतीपार्क येथे श्री सदगुरू अलंकार नावाचे सराफी दुकान आहे. या दुकानावर गेली अनेक वर्ष संशयित काम करीत होता. २० ते २४ सप्टेंबर दरम्यान संशयिताने नागरे दुकानात नसतांना सुमारे ६ लाख ३० हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. त्यात सोन्याची लाखाची पोत,चार शॉर्ट पोती,सोनसाखली, पेंडल,रिंगा आदी दागिण्यांचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.