शिंदे गावात घरफोडी; १ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे एक लाख ६५ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना शिंदे गावात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. संदिप भास्कर साळवे (रा.नायगावरोड,शिंदेगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवे कुटुंबिय शनिवारी (दि.१५) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली एक लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसरीगावातील सिध्दीविनायक गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्यीची घटना घडली. या चोरीप्रकरणी विक्रम बाळासाहेब शेळके (रा.संसरीगाव,दे.कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.१५) रात्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील गाभा-याचे कुलूप तोडून ही चोरी केली. गाभा-यातील दानपेटीचे सेट्रल लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे दहा ते बारा हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.
………