नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शटर वाकवून चोरट्यांनी वर्क शॉपमध्ये ठेवलेला लॅपटॉप आणि कॉपर वायर असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात ही चोरी झाली. या चोरीची तानाजी बाबासाहेब शिंदे (रा.चांदशी ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे लिंक सर्वो सिस्टीम प्रा.लि. या कारखान्याचे व्यवस्थापक असून, शुक्रवारी (दि.१४) रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद कंपनीचे शटर वाकवून वर्कशॉप मध्ये ठेवलेला लॅपटॉप व कॉपर वायर असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.