नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) जुन्या भांडणाची कुरापत काढून पंचवटी भाजी मार्केट एकाने विळ्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला एका व्हेजीटेबल कंपनीत करण्यात आला. या कंपनीत हल्लेखोराने कॅबिनच्या काचा, संगणक,प्रिंटर आणि ए. सीची तोडफोड केली. या प्रकरणी ३ संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यात कंपनीच्या कॅबीन मधून १ लाख ३१ हजार रुपये गहाळ झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सह पोलिस निरीक्षक एस.जी. डंबाळे हे करीत आहे.