नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरात किरकोळ कारणावरून कापड विक्रेत्यावर लाकडी दांडके आणि काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही सर्व मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. शनिवारी रात्री ही मारहाण करण्यात आली. दिवाळीसाठी कपडे खरेदीला आलेल्या काही जणांनी वाद घालून किरकोण कारणातून मारहाण केली. मारहाण करतांना लाकडी दांडके आणि काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून व्यापा-यांनी या घटनेचा निषेध केला आहे.