नाशिक – टाकळी रोडवरील नारायण बापू नगर येथे युवकावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुणाच्या गळ्यावर चाकुने वार करण्यात आले. अनैतिक संबधातून खूनाचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात असून या घटनेतील सर्व आरोपी उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. प्राणघातल हल्ला झालेल्या तरुणास जखमी अवस्थेत स्थानिकांनी प्रथम सिव्हिल हॉस्पिटल व त्यानंतर पुढील उपचारासाठी डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, प्राणघातक हल्ला झालेल्या तरुणाचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेशी अनैतिक संबध होते. त्यामुळे या महिलेच्या नव-याने आपल्या साथीदारासह आगळ टाकळी गाव येथील उसाच्या शेताजवळ जखमी इसमाच्या गळ्यावरती सुरा मारून त्यास गंभीर जखमी केले. या प्रकरणी जखमी असलेल्या तरुणाच्या भावाने तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी प्राणघातक हल्ला करणा-या सर्वांना ताब्यात घेतले आहे.