नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लिफ्ट देऊन प्रवासादरम्यान युवतीबरोबर गैरवर्तन करणा-या कारचालकाविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर नाका या ठिकाणी पीडित युवती लासलगाव येथे मामाच्या घरी जाण्यासाठी लिप्ट मागत असतांना एका कार चालकाने लिप्ट दिली. पण, रस्त्यात त्याने गैरवर्तन करुन अश्लील चाळे केले. त्यामुळे पीडितीच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार चालकाने गैरवर्तन केल्यानंतर या पीडितेला बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने टोलनाक्यावर गाडी हळू होताच आरडाओरडा केला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी पीडितेच्या मदतीसाठी धावले. यावेळी संशयिताने पीडितेला जबरदस्ती गाडीत ओढून घेतले. या घटनेनंतर पोलिसही येथे दाखल झाले. संशयिताने त्यावेळी पोलिसांनी शिवीगाळ केली. त्यामुळे हा सुध्दा गुन्हा संशयितावर दाखल झाला आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील हे करत आहे.