नाशिक : पांजरापोळ भागात पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली. प्रकाश आबासाहेब ठोंबरे (४२ रा.गणेश चौक,रामवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे १८ जून रोजी पांजरापोळ भागातून मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. स्कुटरवर आलेल्या दोघांपैकी एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून भामट्यांनी सुमारे १८ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.