नाशिक : जुने नाशिकमधील नेहरू चौकातीला एका दुकानातून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह मोबाईल लंपास केला आहे. या चोरीप्रकरणी दिव्येश दिलीप नागपुरे (रा.रविवार पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरे यांचे नेहरू चौकातील शहावाडा भागात विनायक कटपिस सेंटर नावाचे दुकान आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास नागपुरे अल्पावधीच्या कामासाठी शेजारी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या दुकानात शिरून गल्यातील ३ हजार रूपयांची रोकड व मोबाईल असा पाच हजाराचा ऐवज चोरून नेला. पोलिस नाईक निंबाळकर करीत आहेत.