नाशिक : पंचवटी भागातील दोन अल्पवयीन मुलीसह निरीक्षण गृहातील मतिमंद मुलगा बेपत्ता झाल्याच्या तीन घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मुलींसह मुलास कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पंचवटी परिसरात राहणा-या दोन्ही मुलींपैकी एक रविवारी (दि.९) दुपारी तर दुसरी सोमवारी (दि.१०) सकाळ पासून बेपत्ता आहे. दोन्ही मुली घरात कुणासही काही एक न सांगता निघून गेल्या असून,त्यांना कोणी तरी पळवू नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे. याप्रकरणी मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उरपनिरीक्षक पाटील व माळी करीत आहेत. तिसरी घटना उंटवाडी भागात घडली. मुलांचे निरीक्षण गृहातील मुकबधीर अल्पवयीन मुलगा सोमवारी (दि.१०) सायंकाळ पासून बेपत्ता आहे. २८ सप्टेंबर रोजी रात्री त्यास पोलिस नाईक एन.पी.काकड यांनी बालगृहात दाखल केले होते. सोमवारी निरीक्षण गृहातील कर्मचा-यांनी सर्व मुलांना जेवणासाठी नेले असता तो आढळून आला नाही. त्यास कोणीतरी पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.