नाशिक : सराफी पेढी चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी रात्री मखमलाबाद गावात घडली. या घटनेत सुमारे ९० हजार रूपये किमतीच्या चांदीच्या दागिण्यावर चोरट्यांनी लंपास केले. या चोरी प्रकरणी योगेश चिंतामन दंडगव्हाळ (रा.उंटवाडी,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंडगव्हाळ यांचे मखमलाबाद गावातील राम मंदिरासमोर लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. रविवारी (दि.९) रात्री दंडगव्हाळ आपले दुकान वाढवून घरी परतले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद दुकानाच्या शटरची कडी तोडून कांऊटरमध्ये लावलेल्या लहान मुलांच्या चांदीच्या तोरड्या, जोडवे,कडे व कॉईन असा सुमारे ९० हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. अधिक तपास जमादार हळदे करीत आहेत.