नाशिक : बळी मंदिर परिसरात मुंबई आग्रा महामार्गाच्या सर्व्हीसरोडने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. रंजना अभिमन सुर्यवंशी (६२ रा.बाफना बाजार मागे,लक्ष्मीनगर अमृतधाम) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्यवंशी या सोमवारी दुपारच्या सुमारास महामार्गाच्या सर्व्हीसरोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. बळी मंदिरासमोरून त्या अमृतधामच्या दिशेने पायी जात असतांना समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळतील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.