नाशिक : औद्योगीक वसाहतीतील दातीर मळा भागात राहणा-या २४ वर्षीय कामगाराने गळफास लावून घेत आत्महत्या केली. रामदास पंडीत कांबळे (मुळ रा. चाळीसगाव जि.जळगाव हल्ली ए १ अॅक्वा कंपनी,कृष्णनगर असे मृत युवकाचे नाव आहे. कांबळे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांबळे दातीरमळयातील ए १ अॅक्वा कंपनीतील कामगार असून तो कारखान्यातच वास्तव्यास होता. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या ठिकाणी लोखंडी शेडमधील अॅगलला वायर बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. अजिंक्य सोनवणे (रा.उत्तमनगर) हे पाण्याचे जार तपासण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. गळफासासाठी वापरण्यात आलेली वायर तुटल्याने कांबळे याचा मृतदेह पडलेला होता. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.