नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगर येथे राहत्या घरातील पायरीवर पाय घसरून पडल्याने ७३ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला.
असगरभाई कादरभाई किराणावाला (रा.आलीव हाईटस,शंकरनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. किराणावाला हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये जिन्यातून ते जात असतांना अचानक पायरीवरून पाय घसरल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.