नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बहुला येथ पूर्व वैमनस्यातून बुधवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल सोनू गुंबाडे (रा.कोळीवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर उभे असतांना विजय डंबाळे, संगिता डंबाळे,संतू गुंबाडे,जानकाबाई गुंबाडे व किशोर गुंबाडे आदी संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने तक्रारदार गुंबाडे जखमी झाल्याचे म्हटले आहे. तर विजय डंबाळे (रा.कुमावत गल्ली,राधाकृष्णनगर सातपुर) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घरासमोर उभा असतांना अनिल गुंबाडे,भिमा कडाळे,दिलीप गुंबाडे,चेतन गुंबाडे व त्यांचे दोन साथीदार आदींनी गाठून जुन्या वादाची कुरापत काढून मारहाण केली. यावेळी संशयितांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत डोक्यात लाकडी दांडका मारल्याने तक्रारदार डंबाळे जखमी झाले असून याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भड आणि सुर्यवंशी करीत आहेत.