नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प भागात घरात घुसून एकाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल बलराज कनगारे (रा.संजय गांधी झोपडपट्टी,दे.कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी जय अशोक यादव (२७ रा.सोनाई निवास,स्लॉट हाऊस पाठीमागे,आनंदरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. यादव गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरातील बेडरूममध्ये झोपलेला असतांना संशयिताने घरात प्रवेश करीत हा हल्ला केला. बेडरूममध्ये शिरलेल्या संशयिताने शिवागाळ व जीवे मारण्याची धमकी देत झोपलेल्या अवस्थेतील यादवच्या तोंडावर कोयत्याने वार केला. या घटनेत यादवचा गालावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.