नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जत्रा हॉटेल परिसरात इंडस एअरटेल टॉवरचे सुमारे ६० हजार रूपये किमतीचे बीटीएस कार्ड चोरट्यांनी लंपास केले. या चोरी प्रकरणी दत्ता प्रभाकर सगर (रा.गणेश नगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडस एअरटेल कंपनीच्या स्वामी समर्थ नगर येथील टॉवरचे चोरट्यांनी नोकीया कंपनीचे सुमारे ६० हजार रूपये किमतीचे चार बीटीएस कार्ड चोरून नेले. हा प्रकार सोमवारी (दि.३) उघडकीस आला. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.