नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील सांडवादेवी मंदिर परिसरात देवदर्शनासाठी रांगेत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या गळयातील लाखाचे मंगळसूत्र हातोहात लांबविल्याचा प्रकार घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैला साहेबराव जोपळे (रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. जोपळे या सोमवारी (दि.३) सकाळच्या सुमारास गोदाघाटावर गेल्या होत्या. सांडवा देवी मंदिरात त्या दर्शनाच्या रांगेत उभ्या असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ९५ हजार ३०० रूपये किमतीचे व साडे तीन तोळे वजनाचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.