नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प भागात राहणा-या ३० वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू दिपक गवळी (रा.प्रताप एनक्लेव,डेअरी फार्म) असे मृत युवकाचे नाव आहे. राजू गवळी याने मंगळवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनात येताच कुटूबियांनी त्याच्यावर कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.