नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहते घरात चक्कर येवून पडल्याने ६० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. अलका शहाजी शिंदे (रा.लक्ष्मी निवास,जिजामाता कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. शिंदे या रविवारी सकाळच्या सुमारास अचानक चक्कर येवून आपल्या राहत्या घरात पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.