नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. या तीन घरफोडीपैकी धोंडगेनगर भागातील घरपोडीत चोरट्याला गजाआड करण्यात आले आहे. ही घरफोडी अमरजीतकुमार दिनानाथ अहवालुया (रा.रितू विहार रो हाऊस, तरण तलावासमोर) यांच्या घरात झाली. गेल्या गुरूवारी ३७ हजार ३०० रूपयांची रोकड चोरीस गेली होती. पोलिस तपासात कन्हैय्यालाल भैय्यालाल ठाकुर (४५ रा.माणिकनगर) याने चोरल्याचे उघड झाले असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर दोन घरफोडीत पोलिसांचा तपास सुरु आहे. दुसरी घरफोडी बोरगड येथे झाली. येथील माधव बाबुराव डबे (रा.अश्लेशा सोसा.एकतानगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डबे कुटुंबिय शुक्रवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील लोखंडी कपाटातील ३० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत. दुसरी घटना तिडके कॉलनीत घडली. आनंद गोविंद रायकलाल (रा.वाईड आर्चेड शेजारी तिडके कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या १६ ऑगष्ट रोजी ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी रायकलाल यांच्या बंद रोहाऊसचे कशाने तरी लॉक उघडून घरातील कपाटात ठेवलेली पाच हजाराची रोकड आणि सोनेचांदीचे दागिणे असा सुमारे ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.