नाशिक – जेलरोड येथील पिन्टो कॅालनीत पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी नऊ लाख रुपये बॅगसह लंपास केले. ओजस दिपक शहा (रा.कर्मयोगी नगर गोविंदनगर) यांनी या चोरीची तक्रार दिली असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा बुधवारी रात्री कामानिमित्त पिण्टो कॅालनीत गेले होते. प्रशांत दिवे यांच्या कार्यालयाजवळ त्यानी आपली स्विफ्ट डिझायर एमएच १५ जीएफ ७३४५ पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरटय़ांनी खिडकीची काच फोडून कारमधून बॅग चोरुन नेली. बॅगेत नऊ लाखाची रोकड व महत्वाची कागदपत्र होते. अधिक तपास पीएसआय गोळे करीत आहेत