नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळी पूल भागात गोदावरी नदीपात्रात उडी घेत तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. दोन दिवसानंतर सदर युवकाचा मृतदेह हाती लागला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष दादासाहेब जाधव (२७ रा.नारायण बापू नगर जेलरोड) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. संतोष जाधव याने दोन दिवसांपूर्वी अज्ञात कारणातून टाकळी पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेतली होती. सलग शोध घेवूनही तो मिळून आला नव्हता. शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी ओढागाव परिसरातील नदीपात्रात पाण्यावर तरंगतांना त्याचा मृतदेह आढळून आला असून संजय जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.