नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर गावात घरात पाय घसरून पडल्याने ७८ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुगंधाबाई बाबुराव कटारे (रा.कटारे गल्ली गंगापूरगाव) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. कटारे या आपल्या राहत्या घरात दरवाज्या समोर अचानक पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीने श्रध्दा हॉस्पिटल मार्फेत आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता शुक्रवारी (दि.३०) रात्री उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.शरद पाटील यांनी खबर दिल्याने गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक झिपवाळ करीत आहेत.