नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४७ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. प्रल्हाद संभाजी धात्रक (रा.वैष्णव रेसि.दत्तनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. धात्रक यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. धात्रक यांनी गुरूवारी (दि.२९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने सुयश हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.