नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – नाशिकरोड पोलिसांच्या जाळ्यात उद्योजक शिरीष सोनवणे यांच्या खूनाचे संशयित मारेकरी जाळ्यात अडकले आहे. या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे हे ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या कारखान्यातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मिळून आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्यास यश येत नव्हते. शहर तसेच ग्रामीण पोलीस या खूनातील आरोपींना पकडण्यासाठी शोध घेत होते. अखेर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे. अद्याप या वृत्ताला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण, मारेकरी जाळ्यात अडकल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.