नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड वरील विद्या विकास सर्कल परिसरात उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतल्यामुळे खळबळ निर्माण झाली. या घटनेनंतर परिसरातील दुकानदारांनी दुकानातील अग्निरोधक यंत्राव्दारे ही आग विझवली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. इलेक्ट्रीक बाईकच्या अचानक पेट घेण्याच्या घटना सर्वत्र होत असतांना नाशिकला ही घटना घडली. जीटीओ कंपनीची ही बाईक असल्याचे बोलले जात आहे. अचानक या बाईकने का पेट घेतला हे कारण अजून समोर आलेले नाही.